Type Here to Get Search Results !

beware of fraudulent messages.

Beware of fraudulent messages.

सदर माहिती सत्य घटना आहे. मित्रानो ही घटना आज दिनांक. 29/08/2022 रोजी. सर्व देशातील नागरिकांना महत्वाची सूचना सदर माहिती सत्य आहे. आज internet च्या काळात देश भरात प्रत्येक व्यक्ती कडे मोबाईल आहे पण त्याचा वापर कसे केले पाहिजे आणि कशा पद्धतीने केले पाहीजे. internet च्या जगात कुठल्याही fraud फसव्या विषयात गुंतू नका. या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

तुमची हुशारी तुमचे रक्षण करेल. अत्यंत महत्वाची सूचना सावधान रहा सतर्क रहा तुमचे निर्णय तुमची जबाबदारी. नमस्कार मित्रांनो मी आहे विशाल नेहमी प्रमाणे आज एक सत्य घटना मी तुमच्या दृष्टी कोणास प्रस्तावणे सह अवगत करणार आहे. आज दिनांक 29/08/2022 रोजीला मला whatsapp वर एक मेसेज आले. आणि हे आहे ते व्हाट्सअँप नंम्बर + 549116615-9295 मी तुम्हांला स्क्रीनशॉट फोटो मध्ये दाखवणार ते तुम्ही पुढील प्रमाणे बघून घ्या.
WhatsApp screen shot of said information
WhatsApp screen shot of said information

Whatsapp वरील दिलेल्या माहिती प्रमाणे ते वॉट्सअप वरील व्यक्ती सांगत आहे.

सर्वांना नमस्कार, मी  प्रकल्पाचा महाव्यवस्थापक आहे आणि मी सध्या अर्धवेळ संघाची भरती करत आहे. तुम्ही तुमच्या फोनवर अर्धवेळ काम करू शकता. नवीन चॅटमधील संदेश गायब करण्यासाठी तुम्ही डीफॉल्ट टाइमर वापरता. सर्व नवीन संदेश पाठवल्यानंतर 24 तासांनी या चॅटमधून अदृश्य होतील. तुमचा स्वतःचा डीफॉल्ट टायमर अपडेट करण्यासाठी टॅप करा. अर्धवेळ नोकरीसाठी 10-20 मिनिटे लागतात! 240RS त्वरित उपलब्ध दैनिक पगार : 1688RS - 5000RS या नोकरीसाठी तुमचे वय किमान 20 वर्षे असणे आवश्यक आहे. मला Whatsapp वर क्लिक करा: https://wa.me/919708814001

10-20 मिनिट मध्ये 240 रुपये कमवायला मित्रानो पैश्याचे झाड नाही लागले आहे. आणि तेही अर्धवेळात ईथे कष्ट करून शेतकऱयाला साधे 200 रुपये मिळू शकत नाही. आणि हे फसवे लोक तुमच्या सारख्या साध्या आणि प्रतिष्टीत नागरिकांची फसवणूक करतात. मग मी दिलेल्या whatsapp link वरती क्लीक केले. आणि automatic दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात गेले. आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला मी Hi म्हणून मॅसेज केले नंतर त्या व्यक्तींनी मेसेज केले की.

सर / मॅडम , आम्ही अर्धवेळ / पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त करत आहोत ! दैनिक पगार 1000-19000Rs! तुमच्या फोनने काम पूर्ण करा! अधिक करा, अधिक मिळवा! जर तुम्हाला ही नोकरी करायची असेल तर कृपया मला तुमचे वय सांगा. मी तुम्हाला नोकरीच्या आवश्यकता सांगेन. वय नोकरी वर्णन आणि rerequirement

मग मी माझे वय 20 वर्ष सांगितले आणि त्या नंतर आणखी ऐक मॅसेज आले आणि त्या message मध्ये लिहले होते.

नोकरीचे वर्णन आणि आवश्यकता :
1. कामासाठी जबाबदार रहा आणि प्रामाणिकपणे काम पूर्ण करा!
2. अर्धवेळ नोकरीसाठी दररोज 30 मिनिटे काम करण्याची आवश्यकता असते.
3. 3-5 अर्धवेळ कार्ये पूर्ण केल्यानंतर, तुम्ही पूर्णवेळ नोकरीसाठी अर्ज करू शकता.
4. कोविड - 19 दरम्यान घरून काम करणे. तुम्ही आवश्यकता पूर्ण केल्यास मी तुम्हाला पुढील पायरी शिकवेन

हे असे task वर task देतात की एकदम profestional जणू काही खरंच आहे. आणि आपण त्याच्यवर विश्वास करायला बळी पडतो. हे ऐक शार्क अट्याक आहे जिथे आपण खोलवर जातो. मग मी विचारले मला समोर काय करायचे आहे ते सांगा नंतर मला ऐक link पाठवले आणि त्यात लिहून होते.

आता तुम्हाला अर्धवेळ खाते नोंदणी करण्यासाठी लिंक उघडणे आवश्यक आहे. https://immall.fun/index/user /register/32458.html नोंदणी करताना, तुम्हाला तुमच्या वापरकर्तानावानंतर कोणतेही चार अंक जोडावे लागतील! पुढे काय करायचे ते मला सांगा यशस्वी नोंदणीनंतर मला सांगा आणि मी तुम्हाला वोर्किंग कसे सुरू करायचे ते शिकवेन.

मी त्या link वर क्लीक केले आणि ते ऐका वेबपुष्टा वर opne झाले. ते नोंदणीकरण मी तुम्हांला दाखवते मी त्याचे स्क्रीनशॉट घेतले आहे. पुढील प्रमाणे पाहूया.
Whatsapp screen shot according to information
Whatsapp screen shot according to information

हेच ते नोंदणीकरण पुष्ट मित्रानो तुम्ही बघा ते किती सुंदर आणि आकर्षित profestional वेबसाईट बनवले आहे. Visit करताना तुम्हांला असे वाटायला लागेल की ते खरे आहे. पण त्याच्या मागचे उद्देश मात्र तुम्हाला फसवणे आहे. जाळ्यात खेचण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात आपली फसवणूक होते. मग मी तिथे नोंदणी केली.

registration

.username.... Vvbhurase
.mobile number... 7889676436
.password... 669087
.payment password... @#1234

अशा पद्धतीने नोंदणी केली आणि नवीनच page opne झाले. आणि त्या पेज वर मला 60 रुपये मिळाले असे दाखवत होत. मग मी विचारले इथे काम कसे करायचे हे कसे चालवायचे. आणि मग मी विचारले माझे Registration successful झाले मग त्यांनी काय सांगितले मित्रांनो.

1.कृपया तुमचे वापरकर्तानाव किंवा लॉगिन पृष्ठ Vvbhurase
2.चा स्क्रीनशॉट द्या. मी तुमच्या पहिल्या अर्धवेळ नोकरीसाठी अर्ज करेन.

मी त्या लॉगिन पुष्टाचा स्क्रीनशॉट घेतला आणि त्यांना send केला. ते स्क्रीनशॉट तुम्ही पुढील प्रमाणे पाहू शकता.
Screen shot of registration confirmation as per information
Screen shot of registration confirmation as per information


मी तुम्हाला तुमच्या पहिल्या अर्धवेळ नोकरीसाठी अर्ज करण्यास मदत केली आहे, तुमच्याकडे सुरुवात करण्यासाठी पाच मिनिटे आहेत का?

मग मी म्हटले होय.

पुढे आम्ही तुमचे पहिले मिशन सुरू करू. या वाटपाचा दावा करण्यासाठी तुम्हाला आता तुमच्या अर्धवेळ खात्यात 100 रुपये जोडावे लागतील. एकदा जोडले की, मी तुम्हाला शोध पूर्ण करायला शिकवेन. टास्क पूर्ण केल्यावर तुम्हाला सुमारे 300 रुपये पगार मिळू शकतो, जर तुम्हाला समजले तर मी तुम्हाला चार्ज करायला शिकवतो.

मी विचारले माझ्याकडे 100 रुपये द्यायला कुठलेच एटीएम कार्ड नाही. ते मी कशा पद्धतीने द्यायचे मला काही सांगा.

रक्कम प्रविष्ट करा चॅनेल निवडा क्लिक करा आणि ठीक आहे.
UPI खाते कॉपी करण्यासाठी क्लिक करा, नंतर तुमचे ऑनलाइन पेमेंट सॉफ्टवेअर उघडा आणि UPI खात्यात 100 भरा. पायरी

मग मी विचारले UPI बदल मला माहिती होती पण ऐक नवीनच त्रुटी दिसून आली ती म्हणजे पेमेंट UTR / संदर्भ क्रमांक एंटर करा ( 12 अंक मग मी म्हटले मला हे समजले नाही. मी पुन्हा म्हटलो मला हे समजले. समोर त्या व्यक्तीने आणखी ऐक उत्तर दिले.

12 अंकी UTR पेमेंटमध्ये कॉपी करा तुम्हाला UPI खाते मिळालेल्या वेबसाइटवर यशाचे तपशील पेज, ते पेस्ट करा आणि सबमिट करा.

मी त्यांना सांगितले मला समजते पण मला वेळ हवा आहे,मग त्यांनी सांगितले की.

जर तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही मला स्क्रीनशॉट देऊ शकता आणि मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने ऑपरेशन शिकवीन. तुम्ही यशस्वीरित्या रिचार्ज केले का?

मग मी नाही मला रिचार्ज करायचा आहे माझ्याकडे काही वेळ आहे कारण माझ्याकडे गूगल पे फोन पे सारखे कुटलेच अकाउंट नाही आहे. आता मी मला काही वेळ देऊ शकत नाही का 

ते म्हणतात तुम्ही रोख पेमेंटसह काय द्याल.

मी..तुम्ही मला कुठे भेटाल मी तुम्हाला रोख पैसे देतो.

ते म्हणतात त्यांना एकतर पैसे देण्यास मदत करण्यासाठी मित्र शोधा आणि कार्य पूर्ण केल्यानंतर 3-5 मिनिटांत रिबेट करा.

मी म्हटले परंतु मला पैसे देण्यासाठी कोणतेही गेटवे नाही.

ते म्हणतात तुमच्याकडे ऑनलाइन पेमेंट सॉफ्टवेअर आहे का तुमच्याकडे ऑनलाइन पेमेंट सॉफ्टवेअर आहे का?
हे 100 रुपयांचे टॉप-अप शुल्क नाही जे आम्ही तुमच्याकडून आकारतो, परंतु तुमच्या नोंदणीकृत शॉपिंग खात्यापर्यंतचे टॉप-अप आहे आणि एकदा तुम्ही हे काम पूर्ण केल्यावर तुमच्या बँक खात्यात पैसे काढता येतील.

मग मी म्हटलो पण आमच्याकडे बँक खाते नाही.

ते म्हणतात मित्राला मदतीसाठी विचारा मी तुम्हाला पैसे कमावण्यासाठी घेत आहे, पैसे कमवण्यासाठी भीक मागत नाही. तुम्हाला या नोकरीमध्ये स्वारस्य असल्यास, मी तुम्हाला शिकवत असलेल्या गोष्टींचे अनुसरण करा.

मग मी डोंगराळ भागात राहतो आणि कोणतेही मित्र नाहीत मला.

ते म्हणतात पैसे कमवायचे आहेत, पैसे कमवायचे आहेत, पैसे भरल्यानंतर माझ्याशी संपर्क साधा,

 मला सांगा पण तुम्ही का आहात हे मला समजत नाही. असे केल्याने, माझा मोबाईल नंबर या टॉप-अपमध्ये समाविष्ट होत नाही. आणि तो माझ्या मोबाईल नंबरवर कसा रिचार्ज होईल? असे मी म्हटलो.

ते सांगतात ऑनलाइन पेमेंट सॉफ्टवेअरशिवाय ही नोकरी घेऊ शकत नाही, तुम्ही तुमच्या स्थानिक कमिशरीकडे रोख रक्कम घेऊन जाऊ शकता आणि त्याला तुमचे खाते तुमच्या खात्यात रिचार्ज करण्यास सांगू शकता.

मित्रानो तर तुम्ही समजले असणार कशी ते तुमची फसवणूक करतात हे मला आधीच समजले होते पण मी त्याच्या बोलण्या नुसार वागत होतो कारण मला जाणून घायचे होते. की नागरिकांशी कशी फसवणूक होते. मी आधीच सर्वाना सूचना दिली की फसव्या संदेशापासून सावध रहा सतर्क रहा. आपण फसलो म्हणून दुसऱ्या व्यकतीला फसवणूक होण्यासाठी सावध करा माणुसकीच्या नात्याने दुसऱ्यांनाही ही post shear करा. धन्यवाद 






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Iframe sync